दीपिकाच्या या ड्रेसच्या किमतीत खरेदी कराल चक्क आयफोन!

बॉलीवूडची लाडकी जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण करणच्या काऊचवर पहिले पाहुणे म्हणून दिसले आहेत.

यावेळी या दोघांच्या लव्हस्टोरीविषयी त्यांनी अनेक रंजक खुलासे केले. 

यावेळी दीपिका आणि रणवीर खूपच क्लासी आणि रॉयल लूकमध्ये दिसले आहेत. 

दीपिकाने यावेळी काळ्या रंगाचा डीपनेक बॉडीकॉन ड्रेस घातला होता, 

दीपिकाच्या या ड्रेसची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल.

दीपिकाचा हा ड्रेस व्हिक्टोरिया बेकहॅमच्या ब्रँडचा आहे. 

Farfetch च्या वेबसाइटनुसार, त्याची किंमत 999 डॉलर्स म्हणजेच 83 हजार रुपये आहे. 

म्हणजेच अभिनेत्रीच्या ड्रेसच्या किमतीत तुम्ही आयफोन खरेदी करू शकता.

रणवीर सिंग देखील ब्लॅक लूकमध्ये हँडसम दिसत होता.