अशा काही गोष्टी कोणाशीच शेअर करू नयेत

अशा काही गोष्टी कोणाशीच शेअर करू नयेत

महान विद्वान मानल्या जाणाऱ्या चाणक्य यांनी मानवाच्या कल्याणासाठी अनेक धोरणे सांगितली आहेत.

या धोरणांचे पालन केल्याने व्यक्ती आपले जीवन अधिक चांगल्या पद्धतीनं जगू शकते.

चाणक्यने “अर्थनाशं मनस्तापं गृहे दुश्चरितानि च वञ्चनं चापमानं च मतिमान्न प्रकाशयेत्” असा एक श्लोक लिहिला आहे.

या श्लोकाचा अर्थ असा आहे की, एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्याशी संबंधित काही वैयक्तिक गोष्टी दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू नयेत.

चाणक्यने नीतिशास्त्रात सांगितले आहे की, आपली आर्थिक स्थिती किंवा पैशाशी संबंधित कोणतीही माहिती इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नये.

श्रीमंत व्यक्तीला प्रभावशाली मानले जाते, त्यामुळे लोक पैशाच्या कमतरतेमुळे त्या व्यक्तीचा आदर करणे सोडून देतात

एखाद्या व्यक्तीला कोणतेही दु:ख असते तेव्हा त्याने ते आपल्या मनात ठेवावे. आपल्या दु:खाविषयी दुसऱ्याला सांगितल्यास आपण कदाचित उपहासाचे पात्र बनू शकतो.

नैतिकतेनुसार, कोणत्याही व्यक्तीने आपल्या जीवन साथीदाराच्या चारित्र्याशी आणि त्याच्या स्वभावाशी संबंधित गोष्टी इतरांना सांगू नयेत.

जी व्यक्ती आपल्या जीवनसाथीचा आदर करत नाही, त्याला समाजात प्रतिष्ठा नसते. अशा लोकांचे वैवाहिक जीवन सुखी राहत नाही.

माणसाला मान मिळाल्यावर गर्व करू नये. त्याचप्रमाणे, व्यक्तीने इतरांसमोर आपल्या अपमानाबद्दल बोलू नये. यामुळे माणूस स्वतःचा स्वाभिमान कमी करतो

फसवणूक झाली तर चुकूनही त्याविषयी इतरांना सांगू नये. असे केल्याने लोक त्या व्यक्तीला मूर्ख समजतात आणि त्याची चेष्टा करतात.