देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं इन्स्टंट आईस्क्रीम!

आईस्क्रीम म्हंटल की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं.

यामध्ये ही अनेक प्रकारचे फ्लेवर उपलब्ध आहेत.

हे बनवताना काही अंशी प्रमाणात केमिकलचा देखील वापर केला जातो. यामुळे बऱ्याच वेळा शरीराला त्रास देखील होतो.

यामुळे पुण्यातील शिवाजीनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शुद्ध देशी गाईच्या दुधापासून केमिकल मुक्त इन्स्टंट आईस्क्रीम तयार केले आहे.

यामध्ये एकूण 12 फ्लेवरच आईस्क्रीम बनवलं जात.

यामध्ये ओरिओ, बोर्बन, बनाना, चिकू, आंबा, अंजीर, सीताफळ, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, बदाम, बटर स्कॉच, पान अश्या वेगवेगळ्या फ्लेवरचा समावेश आहे.

फक्त 50 रुपयेमध्ये हे आईस्क्रीम तुम्हाला खायला मिळेल.

आता हैदराबादी डोसाचा पुण्यात घ्या आस्वाद