20 वर्षानंतर अशी दिसते सोनपरीची फ्रुटी!

नव्वदच्या दशकातील ‘सोनपरी’ ही मालिका तुफान गाजली होती.

यातील सोनपरी व फ्रुटी या भूमिका आजही प्रेक्षकांना लक्षात असतील.

 मराठमोळ्या तन्वी हेगडेनं फ्रुटीची भूमिका साकारली होती.

‘रसना’ स्पर्धेत जिंकल्यानंतर तन्वी त्यांच्या जाहिरातीत झळकली होती, यानंतर तिला लोकप्रियता मिळाली. 

‘सोनपरी’ या मालिकेवेळी तन्वी फक्त दहा वर्षांची होती. 

तन्वी आता ३० वर्षांची झाली आहे.

तन्वी आता फारच सुंदर दिसते. 

 ‘सोनपरी’सोबतच तन्वी ‘शकालाका बूम बूम’ या मालिकेतही झळकली होती. 

तन्वीने २०१५ मध्ये मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. ‘धुरंधर भातवडेकर’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट होता.