घरामध्ये या दिशेला असावं तुळशीचं रोप 

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हिरवी रोपं ठेवणं खूप शुभ आणि लाभदायी मानले जाते.

हिरव्यागार वनस्पतींमधून निघणारी सकारात्मक उर्जा घरात सुख-समृद्धी तर आणतेच पण घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट करते.

वास्तु तज्ज्ञ केपी सिंह सांगतात की,  काही झाडे दक्षिण दिशेला लावणे टाळावे.

त्यामुळे तुळशीच्या रोपाशिवाय काही  झाडे घराच्या दक्षिण दिशेला ठेवू नयेत.

अन्यथा, तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज आपण अशा 4 रोपांविषयी बोलणार आहोत.

मनी प्लांट- केपी सिंह म्हणतात की, वास्तुशास्त्रात मनी प्लांट दक्षिण दिशेला ठेवू नका.

रोझमेरी - वास्तुशास्त्रानुसार रोझमेरी वनस्पती घरामध्ये सकारात्मकता वाढवते.

केळीचे रोप - वास्तुशास्त्रात केळीचे रोप दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवण्यास मनाई आहे.

शमीचे रोप – केपी सिंह म्हणतात की, शमीची रोपे घरात लावल्यानं घरात सुख, समृद्धी आणि शांती राहते.

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. उत्तर दिशेला ठेवणे शक्य नसेल तर उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला लावू शकता.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही