एक निर्णय अन् एकरात 3 लाखांचं उत्पन्न

एक निर्णय अन् एकरात 3 लाखांचं उत्पन्न

पारंपरिक शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केल्यास बऱ्याचदा शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला फाटा देत शेतात बीन्सची लागवड केली. 

रहीमाबाद येथील अंकुश पाटील हे आता एक एकर बीन्स शेतीतून लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. 

एक एकारावर शेडनेट तयार करुन लागवड केलेल्या बीन्सची 50 दिवसांत तोडणी सुरू झाली. 

बीन्सच्या लागवडीसाठी माती, हवामान, सिंचन व्यवस्था यासह सर्व व्यवस्थापनाची कामे योग्य पद्धतीने केली. 

अवघ्या 80 दिवसांत 100 ते 150 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. 

तर एक एकरातून कमीत कमी तीन लाखापेक्षा जास्त नफा कमवू शकतो, असेही पाटील सांगतात.