धनत्रयोदशीला या 3 राशींनी चांदी खरेदी करणं शुभ! घरात होईल धनवर्षा!

धनत्रयोदशीचा दिवस कोणत्याही वस्तू खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो.

मग ते घर असो, वाहन असो, दागिने असो वा भांडी असो.

या दिवशी एखाद्या व्यक्तीने कोणतीही खरेदी केल्यास त्याच्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहते.

धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोषकाळात धन देवता कुबेर, माता लक्ष्मीची पूजा केली जाते.

यंदा आश्विन महिन्यातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते.

यावर्षी शुक्रवार 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी होणार आहे.

कर्क, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी चांदी खरेदी केल्यास भाग्य चमकू शकते.

शिवाय शुक्रवारी चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही