'ही' ट्रिक वापरा आणि अंडी जास्त काळ टिकवा

प्रत्येकाच्या घरी अंडी खाल्ली जातात. अंड्यामध्ये अनेक प्रोटिन असतात ज्यामुळे आरोग्य सुधारते. 

अंडी जास्त काळ टिकून राहण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे जी तुम्हीही वापरु शकता. 

अनेकजण अंडी जास्त काळ टिकवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. मात्र हे करण्याची काही एक आवश्यकता नाही. 

ब्रिटिश पशुवैद्य डॉ. बोलुसो यांनी टिकटॉकवर काही टिप्स शेअर केल्या आहेत. 

अंडी फ्रिजपेक्षा बाहेर कोरड्या जागी ठेवल्यावर जास्त काळ टिकतात. 

बाहेर तापमान बदलामुळे कंडेन्सेशन तयार होते. नंतर अंडी खाता तेव्हा साल्मोनेला होण्याची शक्यता वाढते.

अंडी फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर लगेच वापरु नयेत. 

अंडी वापरण्यापूर्वी 30 मिनिटे रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढली पाहिजेत.

अंडी स्टोरेज करताना ती फक्त बॉक्समध्ये ठेवणे सर्वात महत्वाचं आहे. यामुळे अंडी फुटणार नाहीत आणि गादीमुळे सुरक्षित राहतील.