पुणे शहराची खाद्य संस्कृती प्रसिद्ध आहे. परंतु बाहेरील देशातील पदार्थ ही तेवढेच पुण्यात प्रसिद्ध आहेत.
इटालियन पिझ्झा आणि पास्ता असे अनेक पदार्थ लोकांचे आवडते खाद्य पदार्थ झाले आहेत.प्रसिद्ध आहेत.
पिझ्झामध्ये आज पर्यंत तुम्ही 10 इंच एवढी साईज असलेला पिझ्झा पाहिला असेल.
पण 20 इंच पिझ्झा आणि तो ही इटालियन चवीचा जर पुण्यात खायला मिळाला तर? भारीच ना! याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
पुण्यातील डेक्कन परिसरात असणाऱ्या लार्गो पिझ्झेरिया या कॅफेत हा पिझ्झा मिळतो.
View All Products
या कॅफेचे मालक गिरीश नायर आहेत.
एकाच व्यक्तीला खायचा असेल तर 10 इंच स्लाईस मिळत. 20 इंच पिझ्झा घेतला तर त्यामध्ये दोन टॉपिग्स मिळतात.
120 रुपयांपासून 1100 रुपयापर्यंत पिझ्झा मिळतो.
हा पिझ्झा एका व्यक्तीला खाणं शक्य नाही, अशी माहिती गिरीश नायर यांनी दिली आहे.