दिवाळीला आता काहीच दिवस उरले आहेत. यामुळे लोकांची मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी पाहिला मिळत आहे.
दिवाळीत घर सजावटीतला अनिवार्य घटक म्हणजे आकाशकंदील.
वेगवेगळ्या आकाराचे, विविध रंगाचे आकाशकंदील सध्या पुण्यातील भोरी आळी मार्केटमध्ये ट्रेंडींगमध्ये आहेत.
यामध्ये कोणते प्रकार आहेत? किमत काय आहे? याबद्दलच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
भोरी आळी मार्केटमध्ये पारंपरिक बांबूचे आकाशकंदील विक्रीसाठी आले आहेत.
नवीन डिझाईनमध्ये फ्लोरिअल, छत्रपती शिवाजी महाराज चित्र, चांदणी ट्रेड बॉल, झुंबर आहेत.
परंतु सर्वात जास्त झुंबर आणि लाकडाचे आकाशकंदील सध्या ट्रेंडींगमध्ये आहेत.
300 रुपयांपासून 650 रुपयांपर्यत कंदील या ठिकाणी पाहिला मिळतात.