रात्री आईस्क्रीम
खाणं
का टाळावं?
आईस्क्रीम आवडत नाही असा व्यक्ती विरळाच असेल.
बरेच रात्री जेवल्यानंतर आईस्क्रीम खातात. परंतु असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
आयुर्वेदानुसार गरम जेवण केल्यानंतर थंड पदार्थ खाणे हा विरुद्ध आहार आहे.
तेव्हा रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाल्ल्याने शरीराला कोणते तोटे होतात हे जाणून घेऊयात.
आईस्क्रीममध्ये साखर आणि भरपूर कॅलरीज असतात जे खाल्ल्याने रात्रीची झोप प्रभावित होऊ शकते.
रात्री आईस्क्रीम खाल्यावर ब्रश न केल्यास दातांमध्ये कॅविटीची समस्या वाढू शकते.
रात्री आईस्क्रीम खाल्ल्यास कफ होऊ शकतो.
आईस्क्रीममध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे वजन वाढीची समस्या जाणवते