धनत्रयोदशीला दिवे किती लावावे?

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण.

या सणाच्या प्रत्येक दिवशी घर दिव्यांनी सजवलं जातं, सर्वत्र आकर्षक अशी रोषणाई केली जाते.

धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घरात आवर्जून दिवे लावावे.

आत 13 आणि बाहेर 13 असे एकूण 26 दिवे लावण्याचा सल्ला ज्योतिषी देतात.

यामुळे घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचं वातावरण नांदतं.

ज्योतिषांच्या माहितीनुसार, धनत्रयोदशीला रात्री उशिरा आठवणीने एक लावावा.

या दिव्यामुळे आकस्मित मृत्यू टळतो.

घरातील वृद्ध व्यक्तीने हा दिवा घराबाहेर लावावा.

या दिव्याला यमाचा दिवा म्हटलं जातं. यात चार वाती असाव्या. मोहरीच्या तेलात आपण तो लावू शकता.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)