दिवाळीसाठी 7 सोप्या पण आकर्षक रांगोळी डिझाईन

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घरोघरी रंगीबेरंगी रांगोळी काढल्या जातात, येथे काही सोप्या पण आकर्षक रांगोळी डिझाईन्स आहेत ज्या तुम्ही सहज तयार करू शकता.

गुलाबापासून ते झेंडूपर्यंत, तुमची आवडती फुले घ्या आणि ही रांगोळी डिझाइन अधिक रंगीत बनवा.

फुलांची रांगोळी

तुमच्या हातात फारच कमी वेळ असेल तर रांगोळी बनवण्यासाठी ही पद्धत वापरा. सोप्या आणि झटपट डिझाइन करण्यासाठी काही रंगीबेरंगी दिवे वापरा आणि त्यांना पॅटर्नमध्ये ठेवा.

दिव्यांची रांगोळी

विशेषत: दक्षिण भारतात अशा साध्या पण मोहक, पारंपारिक कोलाम रांगोळी काढल्या जातात, तयार करण्यासाठी ठिपके आणि रेषांचा उपयोग करा.

पारंपारिक कोलाम रांगोळी

ही भव्य रांगोळी डिझाईन तुमच्या घराला शाही लूक देईल. यासाठी खडूने मोर रेखाटून आणि नंतर निळ्या, हिरव्या आणि सोन्याच्या छटा भरून रांगोळीला सुरुवात करू शकता.

मोराची रांगोळी

रांगोळीचे हे पारंपारिक रूप, पायऱ्यांवर किंवा उंबरठ्याशी अशी रांगोळी काढू शकता. त्यात उठावदार रंग भरल्यावर अधिक आकर्षक दिसेल.

संस्कार भारती रांगोळी

पारंपारिक रांगोळीला पर्याय म्हणून पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारी रांगोळी काढली जाते. ही रचना तयार करण्यासाठी उथळ भांड्यात पाणी घ्या, पांढरा डिस्टेंपर पावडरने रांगोळीची रचना करा आणि आवश्यकतेनुसार रंग घाला.

फ्लोटिंग रांगोळी

स्वस्तिक हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक आहे. ही रांगोळी काढण्यासाठी अदोदर चिन्ह काढा आणि नंतर हवे ते रंग भरा.

स्वस्तिक रांगोळी