दिवाळीसाठी खरेदी करा आकर्षक लाईट्स

दिवाळीसाठी खरेदी करा आकर्षक लाईट्स

दिवाळी म्हंटल की घर सजावट आली. यासाठी पणत्या, विविध प्रकारचे साहित्य याने बाजार सजलेले आहेत. 

आपलं घर सजवण्यासाठी आवर्जून आकर्षक विद्युत रोषणाईची खरेदी केली जाते. 

पुण्यातील रविवार पेठेतील मार्केट मध्ये या लाईट्स अगदी स्वस्तात मिळत आहेत.

यंदा चायना लाईट सोबतच भारतीय लाईट देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. 

स्टार लाईट, पणती, सिलेंडर, शुगरकॅन, डायमंड, क्रिस्टल जेल गोटी, वॉटरप्रूफ एलीडी हे प्रकार इथे आहेत. 

मार्केटमध्ये 40 रुपयांपासून 850 रुपयांपर्यंत लाईट्स विक्रीस उपलब्ध आहेत. 

तुम्हालाही तुमची दिवाळी प्रकाशमय करायची असेल तर रविवार पेठेतील मार्केटमधून लाईट खरेदी करू शकता.