हिरा महागडा, म्हणून 'हा' रत्न खरेदी करा!

शास्त्रांमध्ये आढळतो 84 रत्नांचा उल्लेख.

माणिक, मोती, हिरा, नीलम, मरकत  ही आहेत पंचरत्न.

त्यात गोमेद, पुष्कराज, वैडूर्य, पोवळे या चार रत्नांचा समावेश केल्यास होतात नवरत्न.

ग्रह आणि राशीनुसार रत्नांचा वापर ठरतो लाभदायी.

शुक्राला मानलं जातं वैभव आणि धनाचा ग्रह. त्याचं स्थान मजबूत करण्यासाठी वापरतात हिरे.

हिरे सर्वांनाच परवडतील असं नाही. म्हणून वापरले जातात त्याचे उपरत्न.

ज्यांना हिरे खरेदी शक्य नाही त्यांनी ओपल, जरकन किंवा स्फटिक वापरावं,  असा दिला जातो सल्ला.

लक्षात घ्या, मुख्यरत्न असला किंवा उपरत्न असला, तरी तो खरा असावा.

नकली रत्नांचा ग्रह, ताऱ्यांशी काही संबंध नसतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)