शुक्र आणि केतूचं कन्येत मिलन, 'या' राशींची होणार चांदी! 

ज्याेतिषशास्रात ग्रह आणि ताऱ्यांच्या स्थितीला असतं विशेष महत्त्व. 

जेव्हा एखादा ग्रह एखाद्या राशीत करतो प्रवेश, तेव्हा त्याचा परिणाम होतो सर्व 12 राशींवर.

आता शुक्र ग्रह करणार कन्या राशीत प्रवेश. केतू तिथे आधीपासूनच आहे विराजमान.

जवळपास 10 वर्षांनी आलाय शुक्र आणि केतूच्या मिलनाचा योग

याचा कोणत्या राशींना होणार फायदा, पाहूया.

सिंह : शुक्र आणि केतूचं मिलन या राशीच्या व्यक्तींसाठी ठरेल शुभ. आपला व्यवसाय विस्तारेल, अचानक धनलाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल, मान-सन्मान वाढेल, आराेग्यासंबंधित समस्या दूर हाेतील.

मेष : आपल्याला या काळात सर्व आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळेल. व्यवसायातून लाभ होईल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. दाम्पत्य जीवनात सुख येईल, थकलेले पैसे मिळतील.

कन्या : आपल्यासाठी हा काळ अत्यंत चांगला असेल, आत्मविश्वास वाढेल, कार्यक्षेत्रात प्रगती होईल, जुन्या गुंतवणूकीतून फायदा होईल, दाम्पत्य जीवनात आनंद येईल,  थकलेले पैसे परत मिळतील.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)