Ather आणतंय 'फॅमिली' इलेक्ट्रिक स्कूटर! AI फोटो एकदा पाहाच

इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये एथर एनर्जी शानदार परफॉर्म करतेय. कंपनीच्या पोर्टफोलियामध्ये सध्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आहेत. ज्यात 450X आणि 450S चा समावेश आहे.

आता कंपनी आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे सीईओ तरुण मोहतांनी सोशल नेटवर्किंग साइट 'X' वर नवीन फॅमिली स्कूटरची घोषणा केली.

मेहता यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, 'इट्स टाइम फॉर फॅमिली स्कूटर, म्हणजेच हा फॅमिली स्कूटरचा काळ आहे. एथर 450 चांगली बनवण्यात एक दशक गेल्यानंतर आता आम्हाला नाही वाटत की काही आणखी मागणी असेल.'

एका यूझरने असा फोटो बनवला ज्यात पूर्ण फॅमिली स्कूटरवर बसलीये. या फोटोत आई-वडील आणि मुलं एका स्कूटरवर प्रवास करताना दिसताय.

पण या फोटोत एक कमतरता होती, ज्यावर एथर एनर्जीच्या अधिकृत हँडलवरुन उत्तर देण्यात आलं की, हेल्मेट कुठेय?

नंतर यूझरने काही AI जेनरेटेड फोटो शेअर केले. ज्यात स्कूटरवर कुटुंबाने हेल्मेटही घातलं आहे.

मेहतानुसार नवीन फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर परवडणारा असण्यासोबतच आराम आणि चांगला स्पेस प्रदान करेल. नुकतीच एथर एनर्जीचे हे स्कूटर टेस्टिंग दरम्यान स्पॉट करण्यात आले होते.

एथर एनर्जी पुढच्या वर्षी ही फॅमिली इलेक्ट्रिक  स्कूटर लॉन्च करेल. कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन ही स्कूटर तयार करण्यात आलीये.

कंपनीच्या पोर्टफोलियामधील सध्या हा सर्वात स्वस्त मॉडल 450S आहे. ज्यात 2.9kWh ची क्षमताची बॅटरी पॅक आहे. सिंगल चार्जमध्ये हा स्कूटर 115 किलोमीटरपर्यंत रेंज देते.

Ather 450s ची बॅटरी फूल करण्यास 6 तास 36 मिनिटं लागतात. याची टॉप स्पीड 90 किमीयतास आहे. स्कूटरची सुरुवातीची किंमत 1,29,999 रु. आहे.

एथर एनर्जीच्या सीईओंच्या या पोस्टनंतर लोकांनी रिप्लायमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसने जेनरेटेड फॅमिली स्कूटरचे फोटो टाकण्यास सुरुवात केली.