येत्या 4 महिन्यात गृहप्रवेशासाठी फक्त 16 दिवस शुभ, पहा तारखा

कार्तिकी एकादशीपासून शुभ कार्यांना सुरुवात झाली आहे.

अधिक मासामुळे लांबलेली लग्नसराई आता सुरू झाली आहे.

गृह प्रवेशांनाही मुहूर्त मिळत आहेत. हिंदू धर्मात नवीन घरात प्रवेश करण्यासाठी शुभ मुहूर्तही पाहिला जातो.

शुभ मुहूर्त आणि शुभ तिथीवर शुभ कार्य केल्यास घरात सुख-समृद्धी वाढते.

शुभ मुहूर्तावर गृहप्रवेश केल्यानं घरात सुख, समृद्धी आणि देवी लक्ष्मी वास करते, असे मानले जाते.

 नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 मध्ये गृहप्रवेशासाठी कोणते दिवस शुभ आहेत पाहुया.

29 नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 02, 07, 08, 14, 15 या तारखांना शुभ मुहूर्त आहेत.

जानेवारी 2024 मध्ये 02, 08, 14,19, 22, 26, 29 आणि मार्चमध्ये 02, 06, 08 या गृहप्रवेशासाठी शुभ तिथी आहेत.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही