फक्त 99 रुपयांत खरेदी करा ‘इथं’ ड्रेस मटेरिअल

ड्रेसच्या ट्रेंडिंग प्रिंट आपल्याकडे असाव्या, असं प्रत्येक मुलीला वाटतं.

तुम्हाला तुमच्या आवडीचा रेडिमेड ड्रेस कुठे मिळत नसेल, तर तुम्ही पुण्यातील नम्रता मार्केट गाठा.

नम्रता मार्केटमध्ये अगदी स्वस्तात मस्त असे कॉटन मटेरिअल मिळतात.

इथे तुम्हाला हवे ते पॅटर्न आणि रंग मिळतील.

याठिकाणी वेगवेगळ्या रंगांचे कॉटनचे नक्षीदार कापडही उपलब्ध आहेत.

99 रुपये मीटर असं कापड आहे. एखादा कुर्ता शिवून घ्यायचा असेल तर 2 ते अडीच मिटर कापड तुम्हाला घ्यावं लागेल.

कापडापासून ब्लाऊज, ड्रेस, साडी असं आवडीनुसार तुम्ही शिवू शकता.

कॉटन मटेरिअल असल्यामुळे या कपड्यांमध्ये उकडत नाही.

रोजच्या ऑफिस वापरासाठी तुम्ही हे कापड हमखास खरेदी करू शकता.