जितकं सुंदर बेट तितकच धोकादायक इतिहास

हिंद महासागरातील अंदमानमध्ये सुमारे 572 बेट आहेत.

यापैकी एक रॉस बेट आहे, ज्याला नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असेही म्हणतात.

हे बेट जितके सुंदर दिसते तितकाच त्याचा इतिहासही धोकादायक आहे.

येथील अंधार आजही अंदमानच्या काळ्याकुट्ट इतिहासाचे दर्शन घडवतो.

कारण, काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी इंग्रजांनी येथील बंडखोरांना कैद केले होते.

1858 मध्ये ही जागा माणसांना राहण्यासाठी योग्य नव्हती.

नंतर इंग्रजांनी या संपूर्ण बेटाला राहण्यायोग्य बनवले होते.

पण कालांतराने या ठिकाणी रोगराई पसरू लागली आणि कैदी मरु लागले

आजही तुम्हाला या बेटावर अनेक पडक्या इमारती पाहायला मिळतील.