अबब… तब्बल 7 कोटीचा अश्व!

अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठ्या देशी गोवंश व अश्व पशू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनामध्ये 7 मर्सिडीज-बेंझ कार खरेदी करता येतील एवढ्या किंमतीचा म्हणजेच सात कोटीचा अश्व पाहाला मिळाला.

तो दिसतो कसा? हे पाहण्यासाठी यावेळी अक्षरश: पशू प्रेमींची झुंबड उडालेली होती.

मूळचा राजस्थानी असलेल्या या घोड्याचं नाव आहे फ्रेंजेड जी. हा मारवाडी प्रकारचा घोडा आहे.

फ्रेजेंडचा खुराक जाणून तुम्हालाही धक्का बसेल. 

घोडा मालक युवराज जडेजाने सांगितले की, हा घोडा 15 लीटर दूध पितो. दररोज 5 किलो हरभरा आणि 5 किलो डाळी खातो.

आणि हो फक्त मिनरल वॉटरच पितो. फ्रेजेंड हाइब्रिड घोडा आहे.

फ्रेजेंडचे वडील राजस्थानी, तर आई रत्नागिरी प्रजातीची आहे. तो 4 वर्षांचा असून गेल्या दीड वर्षांपासून युवराजसोबत आहे.

तब्बल 1100 हुन स्पर्धांमध्ये तो विजेता ठरला आहे. आजपर्यंत एकाही घोड्याने त्याचा पराभव केलेला नाही.

सोयाबीनपासून चक्क दूध आणि पनीर निर्मिती