हे 5 संकेत मिळत असतील तर तिला तुम्ही आवडताय

1. डोळे बोलतात (Eye Contact)

Eye contact वरून एखादी व्यक्ती दुसऱ्याकडे किती आकर्षित झाली आहे, हे समजते. इतरांपेक्षा ती जास्त काळ तुमच्याकडे पाहत असेल तर तुमच्यासाठी तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे.

2. पाऊलं सतत तुमच्याकडे वळतात

तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती सतत तुमच्या अवती-भोवती राहण्याचा प्रयत्न करते. तिची पाऊलं तुमच्याकडे येण्याची संधी शोधत असतात. काहीजण चालाकपणे ही गोष्ट पुढच्याला समजू न देण्याचा प्रयत्न करतात.

3. छातीत धडधड, तापमान वाढतं

प्रेमात असणे आणि एखाद्याकडे आकर्षित होणे यामुळे शारीरिक काही प्रतिक्रिया निर्माण होतात. त्याच्या तिच्या जवळपास असताना शरीराचे तापमान वाढणे, हृदय वेगात धडधडणे, जलद श्वास घेणं. भावनिक आकर्षणामुळे मन उत्तेजित होतं.

4. तुमच्याकडं जरा जास्तच झुकणं

बोलताना, एकत्र बसताना ती तुमच्याकडे जरा जास्त झुकते, तुमच्याशी जवळून बोलण्याची इच्छा असते, याचा अर्थ ती तुम्हाला लाईक करते. लाईक करत असल्याचे स्पष्ट लक्षण म्हणजे ती व्यक्ती नकळत तुमच्या जवळ येते, तुमच्याकडे  झुकण्याचा कल याची तिला कदाचित जाणीव नसूही शकते बोलताना वारंवार जवळ येणं.

5. बोलताना आवाजाचा टोन बदलणं

आकर्षण प्रेम दर्शवणारे एक अचेतन वैशिष्ट्य म्हणजे आवाजाच्या टोनॅलिटीमध्ये बदल. तुमचा इंटरेस्ट जाणून घेण्यासाठी बोलताना ती वारंवार टोन बदलते.