थायलंडमध्ये एका लग्नादरम्यान विचित्र घटना घडली

इथे एका व्यक्तीने आपल्या लग्नाच्या दिवशी स्टेजवर जाऊन गोळीबार केला

त्याने नवरी, सासू आणि मेहुणीवरही गोळ्या झाडल्या.

पाहुणे रिसेप्शनची वाट पाहत होते, पण इथे काही वेगळंच घडलं.

या घटनेमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही

या सर्वांना ठार मारल्यानंतर नवदेव तिथून पळून गेला नाही

तर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

29 वर्षीय माजी सैनिक आणि पॅरालिम्पिक अॅथलीट चतुरोंग सुकसुकनं हे कृत्य केलं

त्याच्या 44 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत त्याचं लग्न होत होतं.

सकाळी त्यांचं लग्न होतं आणि संध्याकाळी रिसेप्शन चालू असताना हे घडलं