कोण आहे रणदीप हुडाची होणारी बायको? 

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा एक असा कलाकार आहे जो आपल्या प्रत्येक चित्रपटात सर्वोत्तम देण्यासाठी ओळखला जातो.

गेल्या काही दिवसांपासून रणदीप हुडाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

रणदीप हुड्डा लवकरच त्याची गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत 29 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत.

रणदीप हुड्डा बॉलिवूड अभिनेत्री नव्हे तर लिन लॅशराम या मणिपुरी मॉडेलसोबत लग्न करणार आहे.

लिन लैश्रामचा जन्म 19 डिसेंबर रोजी इंफाळ, मणिपूर येथे झाला.

2008 मध्ये ती मिस नॉर्थ ईस्ट इंडियाची फर्स्ट रनर अप होती.

लिनने 'ओम शांती ओम', 'मेरी कॉम', 'रंगून' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनयासोबतच लिनचा व्यवसायाच्या दुनियेतही सहभाग आहे.

लिन लैश्राम रणदीप हुड्डापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.