मोहरीच्या पानांमध्ये जीवनसत्त्व अ, ब, क असतं चांगल्या प्रमाणात. शिवाय मोहरी खनिजं आणि पोषक तत्त्वांनी असते परिपूर्ण.
यात अँटीऑक्सिडंट तत्त्वांचाही असतो समावेश. ज्यामुळे हृदयरोगांपासून होतं संरक्षण. शिवाय मधुमेह, कावीळ, इत्यादी धोकादायक आजारही राहतात दूर.
अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी आपण वापरतो कोथिंबीर. याच कोथिंबिरीत असतात अँटीइंफ्लामेट्री आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म.
कोथिंबीर दररोज खाल्ल्यास सुरळीत होते पचनक्रिया आणि दूर होतात लघवीसंबंधातील सर्व समस्या.
लाल माठ भाजीही असते अत्यंत पौष्टिक. यात जीवनसत्त्व अ, कसह फायबर, फोलेट, रायबोफ्लेविन आणि कॅल्शियमसारखे गुणधर्म असतात भरपूर.
ज्यामुळे विविध रोगांपासून आपलं होतं संरक्षण. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही लाल माठ असते फायदेशीर.
मेथीमध्ये असतं फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्व बी 6, सी, पोटॅशियम, आयर्न, फॉस्फरस आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात.
या भाजीमुळे रक्तातली साखर राहते नियंत्रणात. ज्यामुळे मधुमेहाची शक्यता होते कमी.
पालक भाजीत प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, ओमेगा 3 आणि ओमेगा 6 गुणधर्म असतात चांगल्या प्रमाणात.
रक्तदाब कमी करण्यासह हृदयरोगांपासून संरक्षण करण्याचं काम करते पालक भाजी.