स्वीडनची कंपनी वोल्वोने वोल्वो 9600 केली लाँच. या लग्झरी बसची भारतातही झालीये एंट्री.
लांबी 15 मीटर असलेल्या या बसमधून 10 लोक करू शकतात प्रवास अगदी आरामात.
या बसमध्ये ड्रायव्हरसाठी आहे विशेष व्यवस्था. त्यांची सीट, मिरर, स्टीयरिंग आहे अद्ययावत.
प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था आहे विमानाच्या बिझनेस क्लासच्या सीटसारखी. बसल्या बसल्या झोप लागली तर ते सीटलाच बनवू शकतील बेड.
प्रवासादरम्यान जेवण मिळेलच, परंतु तेही आपल्या आवडीचंच असेल. त्यासाठी बसमध्ये बनवण्यात आलंय खास किचन.
आपला प्रवास सुलभ व्हावा यासाठी बसमध्ये आहे शौचालय.
या बसमधून प्रवास करताना आपल्याला जेवणाची, झोपण्याची अशी कसलीही चिंता करण्याची नाही आवश्यकता.
एवढी खास व्यवस्था म्हणजे बसची किंमतही तशीच असणार हे नक्की.
तर, प्रवाशांनो...या लग्झरी बसची किंमत आहे जवळपास 2 ते 3 कोटी रुपये. म्हणजेच तिकीटही असणार महागडं.