घरात पितृदोष असेल तर या वृक्षांची करावी पूजा

सनातन धर्मात पितरांचा व देवांचाही वास वृक्षांमध्ये मानला जातो.

आपल्या अवती-भोवतीच्या काही झाडांची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.

पं. नंदकिशोर यांच्या मते पितृदोष हा घरातील विविध समस्यांचे कारण मानला जातो.

पिंपळाच्या झाडाला तीळ आणि पाणी अर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात.

भगवान विष्णूला प्रिय असलेल्या अशोक वृक्षावर पूर्वजांचा निवास असतो.

पितृदोष मुक्तीसाठी या वृक्षांची पूजा केल्याने घरात सुख-शांती नांदते.

वडाच्या झाडाला पाणी अर्पण केल्यानंही पितर प्रसन्न होतात, असे मानले जाते.

शंकराला प्रिय असलेल्या बेलपत्राचे झाड लावल्यानं पितर प्रसन्न होतात.

पितृपक्षात तुळशीचे रोप लावल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही