एका व्यक्तीला 5 महिन्यांपासून डोकेदुखीचा त्रास जाणवत होता

मात्र त्याने हे सामान्य समजून याकडे दुर्लक्ष केलं. डोकेदुखीसोबतच त्याची दृष्टीही हळूहळू कमी होत होती

नाकातून सतत फ्लूइड निघत होतं, अखेर तो डॉक्टरांकडे गेला

डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं असता त्याच्या कवटीचे अनेक भाग सुजलेले दिसले.  तसंच तिथे दोन वस्तू अडकलेल्या दिसल्या

हे मेंदूकडून त्याच्या नाकाकडे येत होतं, त्यामुळेच त्याच्या नाकातून द्रव बाहेर पडत होता.

नंतर जेव्हा डॉक्टरांनी त्या माणसाच्या कवटीत दोन तुटलेल्या चॉपस्टिक्स असल्याचं सांगितलं तेव्हा तो स्वतःही थक्क झाला.

चॉपस्टिक्सबद्दल विचारलं तेव्हा त्याला आधी याबद्दल काहीही माहित नसल्याचं त्याने सांगितलं. .

खूप आठवल्यानंतर त्याने सांगितलं की, 5 महिन्यांपूर्वी दारू पिऊन त्याचं कोणासोबत तरी भांडण झालं होतं.

त्याला फारसं आठवत नाही पण त्याला इमर्जन्सी रूममध्ये जावं लागलं. त्यावेळी, डॉक्टरांनी त्याला ड्रेसिंग करून घरी पाठवले होतं,

बहुधा त्याच भांडणात माणसाच्या कवटीत चॉपस्टिक्स पोहोचली असावी.

अखेर वैद्यकीय पथकाने एंडोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे ते काढून टाकलं आणि व्यक्तीची प्रकृतीही स्थिर आहे.