शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत मिळतील गाई म्हशी

नेहमीच बेभरवशाच्या निसर्ग चक्रात अडकणाऱ्या शेतकऱ्यांना जोडधंद्याच्या माध्यमातून आधार मिळत असतो. 

शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारने खास योजना जाहीर केलीय. 

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज केल्यास गाई म्हशींसाठी अनुदान मिळेल. 

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी याबाबत माहिती दिलीय. 

खुल्या प्रवर्गासाठी अनुदान 50 टक्के तर अनुसूचित जातींसाठी 75 टक्के असणार आहे. 

यासाठी 'महा बी एम एस, पोर्टलवर जाऊन 8 डिसेंबर पर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

त्यासोबतच 'ए एच महा बी एम एस' हे ॲप तुम्ही प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. 

गाई म्हशींसोबतच शेतकऱ्यांना कुक्कुटपालन आणि शेळीपालनासाठीही अनुदान मिळते. 

शेतकऱ्यांसाठीच्या या योजनांचे लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची सर्व माहिती तुम्हाला ऍपमध्ये मिळते. 

यामध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, अल्पभूधारक ओळखपत्र अशी मूलभूत कागदपत्रे लागतात. 

डासांच्या कटकटीतून मुक्तीसाठी लावा ही झाडे