घरासाठी स्वस्तात मस्त गालिचे करा खरेदी! 

घराला नवीन लुक देणे हा प्रकार नेहमीच महागडा किंवा वेळ घेणारं मोठे काम असत नाही.

सध्याच्याच घरात फक्त काही गोष्टी इकडल्या तिकडे किंवा भिंतींचे रंग बदलून टाकल्यास हवा तो फ्रेश लुक सहज व कमीत कमी खर्चात येऊ शकतो.

तसेच घरात सुंदर नक्षी असणारे गालिचे टाकले तरीही घर सुंदर दिसतं.

आज आम्ही तुम्हाला पुण्यातील एका अशा ठिकाणा विषयी सांगणार आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला गालीचे अगदी कमीत कमी किमतीत मिळतील.

पुण्यातील विश्रामबाग वाडाजवळ असलेल्या नमो मार्केट मध्ये जयपुरी व काश्मिरी नक्षी काम असलेले गालिचे मिळतात.

या ठिकाणी गालिचांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. अगदी स्वस्तात गालिचे खरेदी करण्यासाठी हे मार्केट चांगला पर्याय आहे.

नमो मार्केटमध्ये जयपुरी गालिचे, काश्मिरी गालिचे, कॉटन, वेलवेट गालिचे आहेत.

450 रुपये पासून ते 1500 रुपयेपर्यंत गालिचे या ठिकाणी उपलब्ध आहेत, अशी माहिती गालिचे विक्रेते अंबादास करोडे यांनी दिली.

'या’ ठिकाणी खरेदी करा लग्नासाठी ट्रेंडिंग शालू