पॉर्न पाहणं गुन्हा आहे की नाही?

जगात असे बरेच प्रश्न आहेत जे लोकांना विचारायचे आहेत परंतु त्यांना योग्य जागा किंवा योग्य व्यक्ती सापडत नाही.

इंटरनेटवर सर्वाधिक शोधला जाणारा प्रश्न म्हणजे पॉर्न पाहणे गुन्हा आहे की नाही. पण, त्याचे नेमके उत्तर बऱ्याच जणांना माहित नसते.

सायबर तज्ज्ञ अमित दुबे म्हणतात, पॉर्न पाहणे गुन्हा नाही. पण, ते पाहण्यासाठी कोणत्या प्रकारची सामग्री वापरली जाते यावर ते अवलंबून आहे.

सर्वप्रथम चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे हा मोठा गुन्हा आहे. POCSO कायद्यानुसार चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते.

अनेक वेबसाइट्स आहेत ज्यांवर भारत सरकारने बंदी घातली आहे. तेव्हा अशा संकेतस्थळांना जर तुम्ही भेट देत असाल तर तो गुन्हा ठरू शकतो.

अनेक वेळा लोक यासाठी VPN किंवा प्रॉक्सी नेटवर्कचा अवलंब करतात. असे नेटवर्क वापरणे देखील बेकायदेशीर आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मते, पॉर्न पाहणं हा असा गुन्हा नाही की ज्याबद्दल कोणालाही घाबरवंल किंवा धमकावलं जाऊ शकेल.

जर कोणी तुम्हाला घाबरवत असेल किंवा धमकावत असेल तर तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकता.

भारत सरकारने बंदी घातलेल्या अशा कोणत्याही वेबसाइटला भेट देऊ नका.