शेअर मार्केट हाय रेकॉर्डवर का आहे? ही आहेत महत्त्वाची 4 कारणं 

शेअर मार्केट हाय रेकॉर्डवर का आहे? ही आहेत महत्त्वाची 4 कारणं 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये भाजपच्या दणदणीत विजयाचा परिणाम शेअर बाजारावर दिसला.

देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक निफ्टी 50 आणि सेन्सेक्स जवळपास दीड टक्क्यांनी वाढले.

इंट्रा-डेमध्ये निफ्टीने 20600 चा टप्पा पार केला आणि  सेन्सेक्स 68600 च्या जवळ पोहोचला.

विश्लेषकांचे मत आहे की, देशांतर्गत बाजारातील तेजीचा कल कायम राहणार असून येत्या व्यवहाराच्या दिवसांत निफ्टी 20800 चा स्तर गाठू शकतो.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होऊन बाजार तेजीत येऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपचा विजय अपेक्षेपेक्षा मोठा होता, असे ब्रोकरेज फर्म जेफरीजचे मत आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पीएम मोदीच पंतप्रधान पदी कायम राहण्याची शक्यता बळावली आहे.

जागतिक पातळीवरूनही बाजारात जोरदार संकेत मिळत आहेत. अमेरिकन बेंचमार्क निर्देशांक 1 डिसेंबर रोजी मजबूत वाढीसह बंद झाले.

चलनवाढ कमी होण्याची चिन्हे असताना, गुंतवणूकदारांना आशा आहे की यूएस फेडरल रिझर्व्ह त्यांच्या 12-13 डिसेंबरच्या बैठकीत व्याजदरात वाढ करण्यावर लगाम घालेल.

बाजारात अशी अपेक्षा आहे की, RBI 6 ते 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेईल.