माइचोंग चक्रीवादळाचा मोठा फटका, 8 जणांनी गमावला जीव
आंध्र प्रदेशात माइचोंग चक्रीवादळ आज धडकणार, 110 KM वेगानं वाहतात वारे
चेन्नईमध्ये चक्रीवादळामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे
याच पार्श्वभूमीवर शाळा, बँका आणि काही कार्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे
तामिळनाडूची राजधानी चेन्नईतील पम्मल भागात रस्त्यांवर लोकांच्या मानेपर्यंत पाणी तुंबले आहे
लोकांना खोल पाण्यातून जावे लागत आहे. कारण शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पूरसदृश परिस्थिती आहे
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन
चक्रीवादळा चा फटका बसलेल्या भागात रेल्वे सेवा सुरळीत आणि सुरक्षितपणे सुरू ठेवण्यासाठी कार्यरत आहे मात्र त्यात काही अडचणी देखील येत आहेत
चक्रीवादळ येत्या २४ तासांत जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 6 डिसेंबरपर्यंत तीव्र राहणार असल्याचा इशारा आयएमडीने दिला