महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी वर्ध्याच्या मातीत!

वर्ध्यातील एक उच्चशिक्षित शेतकरी दाम्पत्य महाबळेश्वर येथे फिरायला गेलं.

महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असल्याने तिथून स्ट्रॉबेरी पिकाची माहिती घेतली.

नुसती माहितीच घेतली नाही तर वर्ध्यासारख्या ठिकाणी स्ट्रॉबेरी पिकविण्याचा निर्धारच केला.

मात्र त्याला आव्हान होतं ते वर्ध्यातलं उष्ण हवामान. मात्र त्यावर शक्कल लढवली आणि हिवाळ्याच्या थंडीत लालबुंद स्ट्रॉबेरी वर्ध्याच्या मातीत बहरली आहे.

हिंगणघाट तालुक्यातील कान्होली कात्री येथील महेश पाटील आणि त्यांच्या पत्नी भारती पाटील असं या उच्चशिक्षित शेतकऱ्यांचं नाव आहे.

वर्धा किंवा विदर्भासारख्या उष्ण ठिकाणी स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेण्याचा विचार कोणीही केला नव्हता. कारण स्ट्रॉबेरीला जगण्यासाठी थंड हवामानाची गरज असते.

आजपर्यंत महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद विदर्भवासी घ्यायचे मात्र या दाम्पत्याने वर्ध्यातच स्ट्रॉबेरी पिकवून नाविन्यपूर्ण शेतीचा सुखद अनुभव घेतलाय.

हे दोघेही खाजगी नोकरी करत होते. मात्र शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोगाची संकल्पना डोक्यात होती.

त्यामुळे नोकरी सोडून स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्धार केला. आता हीच स्ट्रॉबेरी या दाम्पत्याला लाखोंचा फायदा मिळवून देतेय.

पेरूच्या शेतीतून तरुणाची लाखोंची कमाई!