या गोष्टीला किंमत न देणारे कधीच यशस्वी नाहीत होत

या गोष्टीला किंमत न देणारे कधीच यशस्वी नाहीत होत

महान मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांचे धोरणात्मक विचार जगप्रसिद्ध आहेत.

त्यांनी आपल्या नीति ग्रथांत अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने जीवनातील कोणत्याही अडचणीवर मात करता येते.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथात जीवनातील सर्वात शक्तिशाली गोष्ट कोणती आहे, याविषयीही सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनी काळ म्हणजेच वेळ ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट असल्याचे वर्णन केले आहे.

त्यांनी सांगितलंय की, काळ ही अशी गोष्ट आहे जी या सृष्टीलाही नष्ट करते. प्रत्येकाचा काळ हा ज्याच्या त्याच्या हातात असतो.

काळ हा इतका शक्तिशाली आहे की, कोणीही त्याला मागे टाकू शकत नाही. त्याला कोणीही हरवू शकत नाही.

याविषयी ते त्यांच्या श्लोकात म्हणतात- कालः पचति भूतानि कालः संहरते प्रजाः. कालः सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रमः॥

आचार्य चाणक्य म्हणतात की, काळाच्या पुढे कोणीही धावू शकत नाही. जेव्हा कोणाची वेळ येते तेव्हा त्याला कोणी रोखू शकत नाही.

वेळेला किंमत न देणाऱ्याचं आयुष्य मातीमोल होऊन जातं. एकदा गेलेली वेळ काही केल्या परत येत नाही. त्यामुळे वेळेचे भान राखा, कोणतीही गोष्ट नियोजनबद्ध जणू वेळापत्रक लावून करायला हवी.