पुण्यात पिकतंय हिमालयातील फळ

पुण्यात पिकतंय हिमालयातील फळ

सध्याच्या काळात शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. 

सफरचंद म्हंटल की सगळ्यांना जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश आठवतं. 

आता हेच सफरचंद पुण्यातील इंदापूर तालुक्यात पिकत असून निवृत्त शिक्षकाने ही किमया केलीय. 

सणसर येथील शेतकरी प्रभाकर खरात यांनी दार्जिलिंकमधून रोपे आणून सफरचंदाची शेती केलीय. 

विशेष म्हणजे अवघ्या 15 ते 19 महिन्यात त्यांनी सफरचंदाचे पहिले उत्पादन यशस्वीपणे काढले.

प्रभाकर यांचा मुलगा किशोर फिरण्यासाठी जम्मू काश्मीरला गेले होते तेव्हा त्यांनी ही शेती पाहिली.

सुरुवातीला प्रयोग म्हणून 10 गुंठे जागेत सफरचंद लावली आणि पुन्हा त्यात वाढ केली. 

गेल्या 4 वर्षांपासून ते पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने सफरचंद पिकवत आहेत. 

सफरचंदाच्या शेतीसाठी मोठी गुंतवणूक करावी लागते व सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो, असं ते सांगतात.