शेतकऱ्याच्या एका निर्णयानं तूर उत्पादन दुप्पट

शेतकऱ्याच्या एका निर्णयानं तूर उत्पादन दुप्पट

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. 

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कुन्हाळीचे श्रीकृष्ण तांबे प्रयोगशील शेतकरी आहेत.

बीएससी कृषी पदवीधर असणाऱ्या तांबे यांनी नोकरीपेक्षा शेतीच करण्याचा निर्णय घेतला. 

तांबे यांनी तीन एकरावर टोकन पद्धतीने तुरीची लागवड केली आणि त्यामुळे तुरीची वाढ जोमदार झाली. 

दोन ओळीच्या मधील अंतर आठ फूट तर दोन रोपांच्या मधील अंतर दोन फूट ठेवले. 

झाडांना हवा खेळती राहिल्याने रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात झाला आणि 8 फुटापर्यंत झाड वाढले. 

आता एका झाडाला अंदाजे 400 ते 500 शेंगा लगडल्या असून उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. 

टोकन पद्धतीमुळे एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे, असे तांबे सांगतात.