महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या कवड्यांच्या माळेला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबीमध्ये तुळजाभवानीच्या कवड्यांच्या माळेच्या समावेशला केंद्र सरकारच्या स्वामित्व विभागाने मान्यता दिली आहे.
त्यामुळे कुलस्वामिनी तुळजाभवानी तीर्थक्षेत्रासाठी आनंदाची बाब आहे.
तुळजापूरच्या भवानी मातेची कवड्यांची माळ पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. या माळेला ऐतिहासिक वारसा असल्याचं सुध्दा सांगण्यात येत.
आता याच माळेच्या कवडीला महाराष्ट्र राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणून भौगोलीक मानांकन देण्यात आलय.
चेन्नई येथील भौगोलिक मानांकन नोंदणी कार्यालयाकडे राज्यातील अठरा प्रस्ताव पाठवण्यात आले होते.
त्यामध्ये केंद्र सरकारच्या स्वामित्व विभागाने या प्रस्तावाला मान्यता देऊन राज्यातील नऊ वैशिष्ट्यपूर्ण बाबींमध्ये माळेचा समावेश केला आहे.