सध्याच्या काळात काही शेतकरी आपल्या शेतीत नवनवे प्रयोग करत आहेत.
तसेच देश विदेशातील पिकेही घेण्याचा प्रयत्न करतायेत.
महाराष्ट्रात सफरचंद, ड्रॅगन फ्रुट सारख्या फळांची शेती यशस्वी होत असताना आणखी एक विदेशी फळ पिकवलं जातंय.
पुण्यातील इंदापूरचे शेतकरी पांडुरंग बराळ यांनी चक्क ब्राझिलियन पॅशन फ्रुटची लागवड केलीय.
विशेष म्हणजे या शेतीतून त्यांना चांगला नफाही मिळत आहे.
युट्युबवर त्यांना मुळचे ब्राझिलियन असलेल्या पॅशन फ्रुटची माहिती मिळाली.
राजस्थानातील शेतकऱ्याने हे फळपीक घेतल्याचं त्यांना समजलं. तेव्हा त्यांनी राजस्थानात जावून तेथील शेतकऱ्याची भेट घेतली.
पॅशन फ्रुटबाबत माहिती घेऊन आपल्या शेतात या फळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.