दोन फोनमध्ये कसं चालवाव एकच WhatsApp अकाउंट? ही आहे ट्रिक

तुम्हालाही आपलं प्रायमरी WhatsApp अकाउंट दोन फोन्समध्ये एकाच वेळी चालवायचं असेल तर जाणून घेऊया स्टेप्स.

प्रायमरी डिव्हाइसचा WhatsApp दुसऱ्या फोनमध्ये चालवण्यासाठी पहिले दुसऱ्या डिव्हाइसमध्ये WhatsApp चं लेटेस्ट व्हर्जन इंस्टॉल करा.

WhatsApp इंस्टॉल झाल्यानंतर भाषा निवडा. भाषा निवडल्यानंतर फोन नंबर टाकण्यास सांगितलं जाईल.

तुम्हाला फोन नंबर टाकायचा नाही. तर राइट साइडमधील वरच्या बाजूला दिसत असलेल्या मेन्यू ऑप्शनवर टॅप करायचंय.

मेन्यू ऑप्शनमध्ये तुम्हाला Link another device ऑप्शन मिळेल. या ऑप्शनवर क्लिक करताच तुम्हाला एक क्यूआर कोड दिसेल.

यानंतर प्रायमरी डिव्हाइसमध्ये WhatsApp ओपन करा.

राइट साइडमध्ये वरच्या बाजूला दिसत असलेले थ्री डॉट मेन्यूवर क्लिक करुन लिंक्ड डिव्हाइसवर जा.

लिंक्ड डिव्हाइसवर क्लिक केल्यानंतर दुसऱ्या डिव्हाइसमध्ये दिसत असलेल्या क्यूआर कोड स्कॅन करा.

स्कॅन करताच तुमच्या दुसऱ्या डिव्हाइसमध्ये तुमचा WhatsApp अकाउंट चालू लागेल.