30 वर्षांनी होणार शुक्र आणि शनिची भेट, या राशीच्या लोकांचा होणार फायदा

ज्योतिष शास्त्रानुसार, शनि आणि शुक्र ग्रह मित्र मानले जातात.

जवळपास 30 वर्षांनंतर वर्ष 2024 मध्ये शुक्र आणि शनिची युती होणार आहे.

शनि देव 2024 पर्यंत कुंभ राशीत विराजमान राहतील.

अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम पंडित सांगतात की, शुक्र आणि शनिग्रह हे मित्र मानले जातात.

या दोघांच्या युतीमुळे सर्व 12 राशींवर याचा प्रभाव पडेल. 

मात्र, तीन राशी अशा आहेत, ज्यावर शुक्र आणि शनिची विशेष कृपा राहील. 

वृषभ राशी - या राशीच्या लोकांसाठी शनि आणि शुक्राच्या कृपेने आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. व्यापारातही फायदा होणार आहे. 

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनिची युती खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे.

मकर राशी - मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनिच्या कृपेने अचानक धनलाभ होणार आहे.