लग्नानंतर नवी जोडपी जेजुरीला का जातात?

सध्या लग्नसराईचा मोसम सुरु असल्याने शुभ मुहूर्तावर अनेक जोडपी विवाह करत आहेत.

प्रत्येक समाजामध्ये लग्न कार्याच्या वेगवेगळ्या चालीरीती, प्रथा, परंपरा असतात.

लग्नानंतर अनेकांच्या घरी सत्य नारायणाची पूजा केली जाते.

तसेच लग्नानंतर अनेक जोडपी आपल्या कुलदैवताच्या आणि देव दर्शनासाठी जातात.

लग्नानंतर नवीन जोडपी आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करतात.

महाराष्ट्रात जेजुरीचा खंडेराया हा अनेकांचा कुलदैवत आहेत. त्यामुळे बहुतांश लोक जेजुरीला जातात.

खंडेराया हे शिवाचं रुप असल्याचं मानलं जातं, तसेच म्हाळसा देवी ही पार्वतीचं रुप आहे.

त्यामुळे शंकर आणि पार्वतीसारखा आपला संसार व्हावा असा आशिर्वाद घेण्यासाठी अनेकजण येथे जातात.

जेजुरीला गेल्यावर अनेकजण लग्नानंतरचा गोंधळ देखील घालतात.