महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी वर्ध्याच्या मातीत

वर्ध्यातील उच्चशिक्षित शेतकरी दाम्पत्यानं खासगी नोकरी सोडून सेंद्रीय शेती सुरू केलीय. 

हिंगणघाट तालुक्यातील कान्होली कात्री येथील भारती व महेश पाटील असं या दाम्पत्याचं नाव आहे.

महाबळेश्वर येथे फिरायला गेले असता त्यांनी स्ट्रॉबेरी शेतीची पाहिली आणि पिकाची माहिती घेतली. 

स्ट्रॉबेरीसाठी थंड हवामानाची गरज असते पण पाटील दाम्पत्यानं विदर्भातच हे पीक घेण्याचा निर्णय घेतला. 

पाटील यांनी सुरुवातीला प्रयोग म्हणून पाऊण एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवड केली. 

विदर्भासारख्या उष्ण भागात स्ट्रॉबेरी पिकवलेल्या स्ट्रॉबेरीतून त्यांना दीड लाखांचा नफा झाला. 

आता आत्मविश्वासाने त्यांनी ऑगस्टमध्ये 5 एकर जमिनीवर स्ट्रॉबेरी लागवड केलीय. 

यासाठी त्यांना 20 लाखांचा खर्च आला असून 60 लाखांचं उत्पन्न अपेक्षित असल्याचं ते सांगतात. 

पुण्यात पिकतंय ब्राझिलचं पॅशन फ्रुट