तुम्हालाही Spam Call येतात का? असे करा बंद
स्पॅम कॉलमुळे अनेकांना त्रास होतो. यामुळे सायबर फ्रॉडचाही सामना करावा लागतो. एका ट्रिकने यापासून सुटका मिळवता येते.
अनेक लोक व्हॉट्सअॅपवर आलेल्या व्हिडिओ कॉलमुळे सेक्सटॉर्शनचा शिकार होतात. या कॉलपासून बचाव कसा करायचे हे जाणून घेऊया.
इंस्टंट मॅसेजिंग अॅप WhatsApp मध्ये एक खास फीचर आहे. ज्यात बदल करुन स्पॅम कॉल्स थांबवता येतात.
यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्समध्ये बदल करावा लागेल. यानंतर स्पॅम कॉल्सपासून सुटका मिळवू शकता.
WhatsApp च्या सेटिंग्समध्ये जा. तिथे प्रायव्हसीच्या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर यूझर्सला Calls च्या ऑप्शनवर जावं लागेल.
कॉल्सच्या आत यूझर्सला Silence Unknown Calls चा ऑप्शन मिळेल. तो ऑन करा. यामुळे स्पॅम कॉल्सपासून सुटका मिळेल.
Silence Unknown Calls इनेबल केल्यानंतर अनोळखी नंबरवरुन येणारे कॉल सायलेंट राहतील.
असं करुन स्मार्टफोन यूझर्स स्वतःला स्पॅम कॉल्स आणि सायबर फ्रॉडपासून सेफ ठेवू शकता.
WhatsApp चं हे फीचर सर्व यूझर्ससाठी जारी झालंय. तुमच्या फोनमध्येही अद्याप हे दिसत नाहीये तर WhatsApp App ला प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करा.
अनेक स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी इंटरनॅशनल नंबरचा वापर करताय. यामुळे इंटरनॅशनल नंबरवरुन कॉल मॅसेज आल्यास तो इग्नोर करायला हवा.