कोल्हापूरचे खवय्ये आणि चिकन-मटण यावरचे प्रेम हे जगजाहीरच आहे.
त्यामुळेच कोल्हापुरात नॉनव्हेज स्पेशालिटी असणारे हॉटेल मोठ्या जोमाने चालतात.
अशाच प्रकारे कोल्हापुरात एके ठिकाणी खवय्ये बिर्याणी खाण्यासाठी गर्दी करत आहेत.
या हॉटेलमध्ये अनलिमिटेड चविष्ट चिकन बिर्याणी मिळत असल्यामुळे कोल्हापूरकरांनी या ठिकाणाला पसंती दिली आहे.
View All Products
विनायक दगडू पाटील हा खरंतर खुपीरे गावचा एक मेकॅनिकल इंजिनिअर आहे.
शिक्षण पूर्ण करुन तो पुण्यात एका खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत होता.
मात्र त्यानंतर कुटुंबात आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी इतर कोणी व्यक्ती नसल्यामुळे त्याला पुणे सोडून कोल्हापुरात परत यावे लागले.
कोल्हापुरात आपल्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी करण्याचा विचार करताना त्याने हा चिकन बिर्याणीचा पर्याय निश्चित केला.
त्यातही लोकांना कमी किंमतीत चांगल्या चवीची आणि जास्तीत जास्त बिर्याणी खाता यावी यासाठी त्याने कमी पैशात अनलिमिटेड बिर्याणी ग्राहकांना द्यायला सुरू केले.
अनलिमिटेड चिकन बिर्याणी 120 रुपयांना मिळते. सह्याद्री बिर्याणी हाऊस मंगळवार पेठ कोल्हापूर इथे मिळेल.