फोडणी महागली, लसूण खातोय भाव!

राज्यातील सर्वच बाजार समितींमध्ये लसणाला मिळतोय विक्रमी भाव.

सर्वसामान्यांच्या भाजीतला महत्त्वाचा घटक असलेल्या लसणाची राज्यात निर्माण झालीये टंचाई.

त्यामुळे लसणाची फोडणी आता महागली.

मुंबई बाजार समितीत लसणाची विक्री होतेय 110 ते 180 रुपये किलो दराने.

पुण्याच्या होलसेल बाजारात हे दर आहेत 100 ते 270 रुपयांवर.

किरकोळ बाजारात लसणाची किंमत पोहोचलीये 250 ते 325 रुपयांवर.

महाराष्ट्रात जळगाव, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर परिसरात लसणाचं घेतलं जातं उत्पादन.

जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सुरू होतो लसणाचा नवा हंगाम. 

नव्याने उत्पादन होईपर्यंत दरवाढ राहणार कायम, अशी आहे शक्यता.