जगातील सर्वात वजनदार गणपती

जगातील सर्वात वजनदार गणपती

गणपतीची प्रसिद्ध, ऐश्वर्यसंपन्न, भक्तांच्या गर्दीने गजबजलेली स्थळं सर्वानाच माहीत असतात. 

पुण्याजवळ अशीच एक निसर्गाच्या सान्निध्यात अगदी साधेपणाने असणारी 72 फुटी गणेशमूर्ती आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत सोमाटणे फाटा येथे सरला बसंतकुमार बिर्ला यांनी ही मूर्ती साकारली. 

सह्याद्रीच्या डोंगररांगांत जगातील सर्वात वजनदार गणेशमूर्ती असून 1 हजार टन वजन आहे. 

सिमेंट काँक्रीट, स्टील, तांबे वापरत मूर्ती उभारण्यासाठी अडीच वर्षे लागली. 

जानेवारी 2009 मध्ये चिन्मय मिशनचे प्रमुख स्वामी तेजोमयानंदजी यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण झाले. 

16 एकर परिसरात प्रतिष्ठापना झालेल्या या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी 179 पायऱ्या चढून जावे लागते. 

दर 4 वर्षांनी या गणेश मूर्तीवर तांब्याचा लेप लावून तिला नवी झळाळी देण्यात येते. 

बिर्ला समुहाने उभारलेली ही मूर्ती राजस्थानचे कारागीर मातुराम वर्मा व नरेश वर्मा यांनी घडवली आहे. 

माऊलींचा संजीवन समाधी सोहळा