चिवडा म्हंटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि विदर्भात चिवड्याचे खवव्ये कमी नाहीत.
त्यातही यवतमाळ शहरातील आझाद मैदान संकुलात पारंपरिक चिवडा आजही तितकाच स्पेशल आहे.
या चिवड्याला 10 किंवा 20 वर्ष नाही तर तब्बल इंग्रज काळापासून 86 वर्ष झालेत.
स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात सुरू झालेला हा चिवड्याचा व्यवसाय आता चौथी पिढी सांभाळत आहे.
View All Products
स्वर्गीय अंजनाबाई भुजाडे यांनी सुरू केलेला हा व्यवसाय त्यांचे पणतू अजय भुजाडे चालवत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात बुढीचा चिवडा म्हणून हा चिवडा अतिशय प्रसिद्ध आहे.
20 रुपये प्लेट या बुढिच्या चिवड्याची किंमत आहे.
भाजलेले पोहे, मटकी, कांदा, विशेष मसाले आणि लिंबू यांचे मिश्रण घालून स्वादिष्ट चमचमीत चिवडा तयार केला जातो.