वजन कमी करण्यासाठी तुमचा आहार कमी करण्याऐवजी हेल्दी फूड्स खाण्याचा पर्याय निवडणं महत्त्वाचं आहे.
डायटिशियनच्या मते, जर आपण नाश्त्यात काही गोष्टी खाल्ल्या तर आपलं वजन झपाट्यानं कमी होऊ लागतं.
ओट्स अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरचा समृद्ध स्रोत मानला जातो
ते केवळ तुमचं वजन कमी करत नाही तर हृदयविकाराचा धोका कमी करतं आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं.
रोज सकाळी ओट्स खाल्ल्यास शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत नाही आणि वजनही नियंत्रित राहतं.
लसणाची पातही आरोग्यासाठी अमृतासमान, असा करा उपयोग
हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे फायदे; वाचून तुम्हीही आवडीने खाल
मल्टीग्रेन पिठाचे पदार्थ चांगले आहेत. मल्टीग्रेन ब्रेड किंवा त्याची रोटी खूप आरोग्यदायी मानली जाते
जी वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे आणि जर तुम्ही ती नियमितपणे खाल्ली तर तुमचा फिटनेस कायम राहील.
दलिया नेहमीच हेल्दी फूड मानला जातो, यामुळे वजन नियंत्रित करणं सोपं होतं.
तुम्ही दलिया भाज्या किंवा दुधात मिसळून पिऊ शकता. हे फायबर, खनिजं आणि कार्बोहायड्रेट्सचा समृद्ध स्त्रोत मानलं जातं
ते सहज पचलें जातं, त्यामुळे वजन वाढत नाही.