हिवाळ्यात आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी हळद खूप उपयुक्त ठरू शकते. याच्या सेवनानं शरीर उबदार राहतं.

हळदीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, आयर्न, झिंक यासह अनेक पोषक घटक आढळतात.

याशिवाय अँटीबॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म हळदीला अधिक खास बनवतात.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हिवाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात हळदीचा समावेश कसा करू शकता.

हळदीचे दूध हिवाळ्यात तुमचं शरीर उबदार ठेवण्यास मदत करतं.

याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि खोकला, सर्दी यांसारख्या आजारांपासून बचाव होतो.

हळद आणि तुळशीचा काढा- यात अँटीबॅक्टीरियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीफंगल गुणधर्म असतात

जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. याशिवाय तुमची त्वचा चमकदार बनते

 हिवाळ्यात हळदीचं सेवन करण्यासाठी हळदीचा चहा हा उत्तम पर्याय असू शकतो.

हिवाळ्यात तुम्ही हळद आणि ओव्याचं पाणी देखील घेऊ शकता.

याच्या सेवनाने पोटाशी संबंधित आजारही दूर होतात आणि सर्दी-खोकलापासूनही आराम मिळतो.